फिजीमधील साखर कारखान्यांचे गाळपामध्ये सर्वोत्तम कामगिरी

सुवा : फिजीतील तिन्ही साखर कारखाने गळीत हंगामात सातत्याने चांगली कामगिरी करीत आहेत, असे फिजी शुगर कॉरपोरेशनने आपल्या नव्या अपडेटमध्ये म्हटले आहे. एसएससीच्या म्हणण्यानुसार, कारखान्यांसमोर जळालेला ऊस, खराब ऊस अशी आव्हाने असतानाही गाळप योग्य पद्धतीने सुरू राहिले आहे.

गाळपाचे आतापर्यंतचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. आणि या हंगामात साखरेचा उतारा गेल्या चार वर्षांच्या तुलनेत चांगला आहे. मात्र, ऊसाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरज अद्याप आहेच. तरच एफएससी २०२२ हंगामामध्ये मजबुत होईल. १९ सप्टेंबरपर्यंत, एफएससीने एक मिलियन टनाहून अधिक उसाचे गाळप केले. यामध्ये लाबासा कारखान्याने ४,२१,७२८ टन, लुटोका कारखान्याने एकूम ३,६०,६९९ टन ऊसाचे गाळप केले आहे. तर रारावाई कारखान्याने एकूण ३,२८.८०० टन ऊसाचे गाळप केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here