चंदीगढ (बंसल) : सहकारी साखर कारखान्यांनी यावेळी सर्वोत्तम कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन हरियाणाचे सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी केले. शाहबाद साखर कारखान्याने या वर्षी १०.७५ टक्के साखर उत्पादन करताना ७.५० लाख क्विंटल साखर उत्पादनाचा उच्चांक प्रस्थापित केला आहे, असे त्यांनी सांगितले. सहकार मंत्र्यांनी गुरुवारी राज्यातील एकमेव कुरुक्षेत्र-शाहबादमध्ये सुरू असलेला इथेनॉल प्लांट, साखर कारखाना, विटा प्लांटची पाहणी करून उत्पादनाची स्थिती जाणून घेतली. साखर, तसेच वीज उत्पादनासह दररोजच्या क्रशिंगचीही माहिती घेतली.
पंजाब केसरीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचे ८० टक्के म्हणजे २६३ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. उर्वरीत पैसेही लवकरच दिले जातील. शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळावेत आणि कारखाने आत्मनिर्भर व्हावेत यासाठी प्रयत्न आहेत. शाहबाद प्लांट प्रदूषणुक्त राहावा असे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्याने शेतकऱ्यांना कँटिन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. कारखाना दररोज हजारो क्विंटल उसाचे गाळप करीत असू दररोज ५३ केएलपी इथेनॉल उत्पादन होत आहे. इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्टही सहज गाठले जाईल, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले. कारखान्याने ५ कोटी युनिट विज उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सरकार कारखान्याकडून ४.१० रुपये प्रती युनिटने विज खरेदी करीत आहे. मात्र, कारखान्यांना ६.१० रुपये दराने विज दिली जाते. यात जवळपास २ रुपयांचे नुकसान होते. याबाबत मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिले.