सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने एकरकमी एफआरपी देण्यासाठी तयार

185

सांगली: जिल्ह्यामध्ये उस दराबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली चढाओढ अखेर संपली. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी या हंगामामध्ये एकरकमी एफआरपी देण्यावर सहमती दाखवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्या कडेगाव मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला जिल्ह्यातील सर्व कारखानादारांनी मान्य केले. हा निर्णय शेतकर्‍यांसाठी एक मोठा दिलासा आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये उसाचे गाळप सुरु झाले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कारखान्यांकडून एफआरपी घेषित करण्यात आली नव्हती, ज्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीं यापूर्वीच एफआरपी एकरकमी भागवण्याचा निर्णय घेतला होता. सांगलीच्या शेतकर्‍यांचे लक्ष जिल्ह्यातील कारखान्यांच्या भूमिकेवर होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानादार यांच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. बैठक अयशस्वी राहिली कारण कोणताही निर्णय घेतला केला नव्हता. बुधवारी कडेगाव येथील सानहिरा साखर कारखान्याच्या कार्यालयामध्ये दुसरी बैठक झाली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्यावर सहमती दाखवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी सांगितले की, यावर्षी गाळप हंगाम आता सुचारु रुपात जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here