साखर कारखाने येणार अडचणीत, यंदा हंगाम तीन महिन्यांचाच

272

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ऊसाचे उत्पादन 80 लाख टनाने घटण्याचा अंदाच वर्तवला असून, गळीत हंगाम तीन महिने चालवताना साखर कारखान्याची दमछाक होणार आहे. ऊसाचे उत्पादन घटल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार आहेच, त्याचबराबेर अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडलेले साखर कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत.  महापूर व अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे किमान एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम राहणार आहे.

मागील हंगामात बहुतांशी कारखान्यांनी दोन, तर काही कारखान्यांनी तीन टप्प्यात एफआरपी दिली होती. तोच फॉर्म्युला यावर्षी राबविण्याचा हालचाली सुरु आहेत.  राज्याच्या एकूण ऊस उत्पादनापैकी 30 टक्के ऊस हा कोल्हापूर व सांगली या साखरपट्ट्यात होतो. मागील हंगामात यामध्ये सर्वाधिक दोन कोटी सोळा लाख गाळप कोल्हापूर विभागाचे होते. शिवाय 38 कारखान्यांमुळे हा विभाग साखर उतार्‍यावरही आघाडीवर होता. पण यंदा हे कोठार अडचणीत आहे. महापुरामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील 62 हजार हेक्टरवरील ऊस बाधित झाला आहे. ज्या काळात ऊसाची वाढ होते, त्याच काळात पाऊस राहिल्याने ऊस उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.

सांगली जिल्ह्यातही हीच परिस्थिती असल्यामुळे ऊसाच्या उत्पादनात सरासरी 35 टक्के घट झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरात 80 ते 90 लाख टन, तर सांगलीत 55 ते 60 लाख पर्यंत उत्पादन खाली येण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर अखेरीस साखर हंगाम सुरु होत असल्यामुळे सोलापूर, सांगली व कोल्हापूरातील कारखान्यांची धुराडी 1 नोव्हेंबरलाच पेटत होती. पण यंदा परतीच्या पावासनेही शिवारात पाणी आणले आहे. अजूनही अनेक ठिकाणी पाऊस सुरुच आहे. जर पाऊस थांबला तर 15 नोव्हेंबरनंतर काही कारखाने सुरु होतील, अन्यथा नोव्हेंबरचा शेवटचा आठवडाही उजाडू शकतो.

सांगली, कोल्हापूर कारखाने आणि एफआरपी रक्कम

शाहू 2878
हमिदवाडा 2953
बिद्री 2964
भोगावती 2837
घोरपडे 2669
कुंभी 2929
जवाहर 2874
शिरोळ 2835
शरद 2827
गुरुदत्त 3070
पंचगंगा 2946
आजरा 2746
राजाराम 2771
वारणा 2600
दालमिया 3017
गडहिंग्लज 2703
डी.वाय. पाटील 2769
गायकवाड 2828
इको केन 2617
हेंमरस 2870
महाडिक 2317
तांबाळे 2638

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here