लखीमपूर-खिरी : बलरामपूर समुहाच्या गुलरिया साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बलराम अॅप लाँच केले आहे. एका मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांना याची वैशिष्ट्ये सांगण्यात आले. या कार्यक्रमात कारखान्याचे कार्यकारी संचालक, युनिट प्रमुखांनी मांर्गदर्शन केले.
गुलरिया साखर कारखान्यात आयोजित बलराम अॅपचे लाँचिंग साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक अवंतिका प्रमुख, युनिट हेड एन. के. अग्रवाल यांनी संयुक्तरित्या दीप प्रज्वलनाने केला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अवंतिका यांनी सांगितले की, या अॅपच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्याच आपल्या ऊस शेतीबाबत माहिती मिळवू शकतात. अडचणी सोडवू शकतात. या अॅपचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना डिस्काउंटही दिला जाणार आहे.
युनिट हेड अग्रवाल म्हणाले, माहिती नसल्याने शेतकरी अनेकदा पिकामध्ये जादा खते, किटकनाशके यांचा वापर करतात. त्यामुळे शेतीचे नुकसान होते. या अॅपमधून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती मिळेल. पाऊस कधी पडेल, शेतात किती बियाणे, खत वापरावे याची माहितीही मिळून जाईल.
कार्यक्रमाला कारखान्याचे उप महाव्यवस्थापक तुषार अग्रवाल, लखन लाल त्रिवेदी, अभिनेष मिश्रा, ऊस अधिकारी बृजेश पटेल, मेजर सिंह, संतोष सिंह, निवास कापडी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
To receive ChiniMandi updates on WhatsApp, please click on the link below.
WhatsApp Group Link