केंद्र सरकारच्या मदतीशिवाय साखर कारखानदारी अडचणीत: हसन मुश्रीफ

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर, ता. 30 : कधी नव्हे इतकी साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. जर केंद्र व राज्य शासनाने आता मदत केली नाही तर पुढील वर्षी अनेक साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करता येणार नाही, अशी भीती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “कारखान्यांना कर्ज दिलेल्या बँकाही अडचणीत आल्या आहेत. अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला आता मोठ्या पॅकेजची गरज आहे. सध्या साखरेच्या पोत्याला १५५ रुपये जीएसटी आहे. यावर्षी साखर उत्पादन ३२८ लाख टन झाले आहे.”

मुश्रीफ म्हणाले, “गतवेळी १०७ लाख टन साखर शिल्लक होती. वर्षाला ३२८ लाख टन साखरेचे उत्पादन २३५ लाख टन साखरेचा खप आहे. अपेक्षित आहे. म्हणजेच ४३५ लाख पावसाळ्यापर्यंत ३२ लाख टन निर्यात होईल. जवळपास १४५ टन साखर पुन्हा शिल्लक राहणार आहे. तसेच पुढील वर्षीच्या गळीत हंगामातील उत्पादित होणा-या साखरेचा विचार करता, साखर उद्योगावर मोठे संकट आले आहे.”

मर्यादेपेक्षा वित्तपुरवठा

आठ ते नऊ साखर कारखान्यांनी एकही कण साखर विकलेली नाही, तर चार ते पाच साखर कारखान्यांनी केवळ पाच टक्के साखर विकली आहे.
त्यामुळे बँकांचे हप्ते तटले आहेत. साखर कारखान्यासह बँकाही मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्या आहेत. सॉफ्ट लोन देऊनही एफआरपी देणे शक्य झाले नसल्याचे आ. मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हा बँकेने एका युनिटसाठी किती कर्ज द्यावे, याबाबत काही धोरण आहे. या सर्व धोरणाच्या पलीकडे वित्तपुरवठा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here