साखर कारखान्यांकडून २१.८० कोटी रुपयांची ऊस बिले अदा

शाहजहांपूर : जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी गळीत हंगामात प्रारंभ केला आहे. कारखान्यानी नव्या हंगामातील गाळपाची बिले देण्यास सुरुवात केली आहे. रोजा साखर कारखान्याने १२ नोव्हेंबरपर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी १७१९ शेतकऱ्यांना ३.१८ कोटी रुपये दिले आहेत.

निगोही साखर कारखान्यांनी ९४०३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १८.६४ कोटी रुपये जमा केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५ लाख क्विटंल उसाची खरेदी करण्यात आली आहे. पुवाया साखर कारखान्यानेही गाळपास सुरुवात केली आहे.

शुक्रवारपासून मकसूदापूर कारखान्यानेही गाळप सुरू केले. साखर कारखान्यांच्या सर्व खरेदी केंद्रांतून ऊस खरेदी सुरू झाली आहे. तिलहर साखर कारखान्यात २१ नोव्हेंबरपासून गाळप सुरू होईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्व कारखान्यांनी सहकारी ऊस विकास समिती रोजा आणि पुवायाने मदत केंद्र सुरू केले आहे. शेतकरी आपल्या कोणत्याही अडचणीसाठी तेथे संपर्क साधू शकतात असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मोबाईलवरुनही माहिती दिली जात आहे. कोणत्याही गैरसोयींबाबत चौकशीसाठी ऊस आयुक्त विभागाच्या १८००-१२१-३२०३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here