युपी: थकीत ऊस बिले देण्यासाठी कारखान्यांनी ठेवली ३०० कोटींची साखर तारण

बुलंदशहर : जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२२-२३ मधील शेतकऱ्यांची ऊस बिले देण्यासाठी बँकांकडे जवळपास ३०० कोटी रुपयांची साखर तारण ठेवली आहे. ही साखर तारण ठेवल्यानंतर या बँकांना जादा सीसीएल म्हणजे कॅश क्रेडिट लिमिट मिळाले आहे. आता कारखाने साखर विक्री करून बँकांची कर्जफेड करीत आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील चारही कारखान्यांनी बँकांकडून सीसीएल घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळाले. कारखान्यांनी हंगामात ९२७.७९ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला. आता कारखान्यांकडे १०२.१६ लाख रुपयांची थकबाकी आहे. ज्या कारखान्यांनी बँकांकडून कॅश क्रेडिट घेवून बिले भागवली, त्यामध्ये बुलंदशहरच्या वेव कारखान्याने ४० कोटी रुपये, सहकारी साखर कारखान्याने १२६ कोटी रुपये, अगौताच्या अनामिका कारखान्याने ८० कोटी आणि साबितगढ कारखान्याने १५० कोटी रुपयांहून अधिक कॅश क्रेडिट उचलले आहे. कारखान्यांनी गळीत हंगामात १६,९२,७८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ही साखर बँकांकडे तारण आहे.

जिल्ह्यातील चारही कारखान्यांनी गळीत हंगामात ९२६.७९ लाख क्विंटल ऊस शेतकऱ्यांकडून खरेदी केला. त्यापोटी शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. सध्या वेव साखर कारखान्याकडे ४३ कोटी ५२ लाख रुपये, अनामिका साखर कारखान्याकडे ३० कोटी ३६ लाख रुपये, सहकारी साखर कारखाना अनुपशहरकडे २८ कोटी २८ लाखांची थकबाकी आहे. साबितगढ कारखान्याने शेतकऱ्यांची सर्व बिले अदा केली आहेत, असे जिल्हा ऊस अधिकारी बि. के. पटेल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here