कोरोना वायरस: साखर कारखानदारांनी कर्नाटक सरकारकडून बेलआऊट पॅकेजची मागणी केली

बेंगलुरू: चीनी मंडी

कोरोना वायरस चा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेक उद्योगांचे खूप मोठे नुकसान होत आहे, ज्यामध्ये साखर उद्योग ही सामिल आहे. राज्यातील साखर विक्रीत फार मोठी घसरण झाली आहे आणि इथेनॉल डिस्पेच देखील थांबले आहे. यामुळे साखर कारखान्यांवर मोठा दुष्परिणाम होत आहे.

साउथ इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (SISMA) चे अध्यक्ष जगदीश गुडगुंती यांनी सांगितले की, लॉक डाऊन मुळे , आइसक्रीम पार्लर आणि कन्फेक्शनरी निर्मिती बंद झाल्यानंतर साखरेचा वापर कमी झाला आहे. पेट्रोल आणि डीजेलच्या कमी मागणीमुळे इथेनॉल डिस्पैच ही थांबले आहे.

गुडगुंती म्हणाले कि, आर्थिक संकटामुळे कारखानदार शेतकऱ्यांची थकबाकी भागवू शकत नाहीत. साखर उत्पादनही कमी झाले आहे. कर्नाटक राज्या मध्ये 15 एप्रिल, 2020 पर्यंत 63 साखर कारखान्यांनी गाळप करुन 33.82 लाख टन साखरेचे उत्पादन केले, जे गेल्या हंगामात याच अवधीत, 67 साखर कारखाने ऊस गाळप करत होते. ज्यांनी 43.20 लाख टन साखर उत्पादन केले होते.

राज्यात साखर कारखान्यांनी ऊसाची थकबाकी भागवणे तसेच पुढच्या वर्षाच्या गाळपासाठी सरकारच्या गैरंटी सह सॉफ्ट लोन च्या रुपात 1,000 करोड़ रुपयाचे पॅकेज मिळावे, अशी मागणी केली आहे. SISMA ने सरकारकडून शेतकऱ्यांना उर्वरक, कीटनाशक, बी आणि इतर साहित्याचा मोफत पुरवठा व्हावा अशीही मागणी केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here