साखर कारखान्यांनी आगामी हंगामासाठी ठोस योजना आखावी : ऊस आयुक्त

91

लखनऊ: राज्यातील चौदा साखर कारखान्यांच्या विकास कार्यक्रमांतर्गत ऊस आयुक्त कार्यालयाने व्हर्च्युअल आढावा बैठक घेतली. यामध्ये कुंदरकी, इटईमैदा, रुदौली, मुंडेरवा, हैरदगड, प्रतापपूर, पिपराईच, सठियांव, घोसी, देवबंद, गांगनौली, गागलहेड़ी, विसौली आणि न्याली यांचा समावेश होता. यावेळी मुख्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह फिल्डवरील अधिकारी, ऊस उपायुक्त, जिल्हा ऊस अधिकारी, साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक सहभागी होते.

आढावा बैठकीत २०२०-२१ या गळीत हंगामात काही कारखान्यांनी आपली उद्दीष्ट पूर्ती केली नसल्याबद्दल ऊस आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. २०२१-२२ आणि २०२२-२१ या कालावधीसाठी खास योजना तयार करावी. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी साखर कारखानानिहाय योजना तयार करावी अशा सूचना करण्यात आल्या.

मुख्यालयाच्या स्तरावरून जिल्हामध्ये स्थापन करण्यात आलेल्या रोपवाटिका, महिला स्वयंसाह्यता गटांनी तयार केलेली रोपे, टिश्यूकल्चर लॅबमधील रोपे, प्रगतशील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या रोपांचे वाटप करण्यात यावे असे ऊस आयुक्तांनी सांगितले. साखर कारखान्यांनी गरजेनुसार, स्थानिक स्तरावर बियाणे वितरण व्यवस्था निर्माण करावी अशा सूचनाही देण्यात आल्या.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here