पहिल्या उचलीपेक्षा अंतिम दर किती देणार, हे साखर कारखान्यांनी स्पष्ट करायला लागणार: संजय कोले

131

सांगली: यंदा महापुरामुळे उसाची कमतरता असल्याची भीती दाखवली जात आहे. काही भागात ऊस बुडाला असला तरी, अन्यत्र भरपूर पावसामुळे ऊस चांगला पोसला आहे. कारखाने एप्रिलपर्यंत चालतील. गतवर्षीची साखर शिल्लक आहे. हा साखर साठा पाहता एफआरपीपेक्षा जास्त दर म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केला. रघुनाथदादा पाटील आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांना फसवत असल्याचेही ते म्हणाले. पहिल्या उचलीपेक्षा अंतिम दर किती देणार, हे कारखान्यांनी स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.

कोले म्हणाले, दोन्ही संघटना जादा दराचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना फसवत आहेत. कर्नाटकची राज्यबंदी म्हणजे थोतांड आहे. काही कारखान्यांची नोंदणी बहुराज्यीय असल्याने ते कर्नाटकातून ऊस आणणार हे स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी बाशेखान मुजावर, शंकर कापसे, अल्लाउद्दीन जमादार, एकनाथ कापसे, यशवंत कवठेकर, सचिन गवळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here