आपल्या परिसरातील शेतकर्‍यांना साखर कारखान्यांनी सॅनिटाइजर आणि मास्क वाटप करावेत: मंत्र्यांचा सल्ला

जयपूर (राजस्थान): देशभरात मध्ये सुरु असलेल्या राष्ट्रव्यापी लॉकडाउन मध्ये राजस्थान मध्ये देखील कोरोना ची लढाई जिंकण्यासाठी सूबे च्या सरकारने कंबर कसली आहे. प्रदेशातील गावामध्ये कोरोंनाचा फैलाव होवू नये यासाठी राजस्थान सरकार सतर्क आहे. 20 एप्रिल पासून गावांमध्ये शेंती, शेतकर्‍यांशी संबंधित असणारी कामे करण्यासाठी भारत सरकारने सशर्त सूट दिली आहे. घरातून बाहेर पडणार्‍या शेतकर्‍यांना शेतात आणि बाजारामध्ये जातेवेळी मास्क वापरण्यासारखे उपाय करण्यासाठी सांगितले आहे, त्यामुळे कृषी काम करताना कोरोनाच्या धोक्यापासून वाचले जावू शकेल.

शेतकर्‍यांना कृषी कार्यातून सूट मिळाल्या दरम्यान, सावधानता बाळगण्यासाठी काम करताना प्रदेशचेकृषी मंत्री लाचंद कटारिया यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना आवाहन आहे की, काम करताना सावधानी बाळगा. तोंडावर मास्क वापरा, तसेच हात सॅनिटाजरने साफ करा आणि कृषीची उपकरणे इतरांबरोबर शेअर करु नका. कृषी उत्पादनांच्या विक्री दरम्यान, जर बाजारात जावे लागणार असेल तर पूर्ण सावधानी बाळगा.

प्रदेशच्या ऊस शेतकर्‍यांद्वारा साखर कारखान्यापर्यंत ऊस घेवून जाताना ठेवण्यात येणार्‍या सावधानतेबाबत बोलताना मंत्री म्हणाले, सूबे च्या श्रीगंगानगर, हनुमानगढ आणि चित्तोडगड शिवाय बूंदी आणि इतर ठिकाणी ऊसाची शेती असते. इथे ऊस तोडणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. आता श्रीगंगानगर येथे असणार्‍या सहकारी साखर कारखान्यात सैनिटायजर बनवण्याचे काम होते. कारखान्यात येणारे ऊस शेतकरी आणि आसपासच्या ग्रामीण किंवा कारखान्यांद्वारा मास्क आणि सैनिटायजर दिले गेले तर ही चांगली सुरुवात असेल. मंत्री म्हणाले, शेतकर्‍यांना बाजारात आपल्या कृषी उत्पादनांना विक्रीला घेवून जातेवेळी देखील कोरोना पासून सुरक्षेची गरज आहे. कृषी मंत्री कटारिया यांनी सांगितले की, सरकार आपल्या स्तरावर बरच काही करत आहे. पण साखर कारखान्यांही पुढे जावून काम करण्याची गरज आहे, ज्यामुळे कोरोना वायरस च्या या जागतिक महामारी मुळे ग्रामीण जनतेला संक्रमणमुक्त ठेवले जावू शकेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here