शेतकर्‍यांची थकबाकी न दिल्यास कारखान्यांवर पोलिस कारवाई

उत्तर प्रदेश : यंदाचा उस गाळप हंगाम संपूनही उत्तर प्रदेशातील उस उत्पादक शेतकर्‍यांना कारखान्यांकडून 9 हजार कोटी रुपये अजूनही मिळालेले नाहीत. साखर आयुक्त संजय भुसारेड्डी यांनी कारखान्यांना शेतकर्‍यांचे देणे लवकर द्यावे अशी विनंती केली. कारखान्यांकडून शेतकर्‍यांना साधारणपणे 71 टक्क्यांपेंक्षा अधिक देणं बाकी आहे. ते न भागविल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात येईल आणि शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनासाठी पैसे देण्यास अपयशी ठरल्यास मालमत्ता ताब्यात घेण्यात येतील.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खाजगी कारखान्यांना, ऑगस्ट 2019 पर्यंत संपूर्ण बाकी चुकविण्याची चेतावणी दिली होती. लोकसभेच्या निवडणुकीत उसाची थकबाकी हा विरोधी पक्षांनी भाजपा सरकारच्या विरोधात वापरलेला एक महत्वाचा विषय होता.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here