युटोपियन शुगर व फॅबटेक शुगर बनवणार सॅनिटायजर

156

मंगळवेढा (सोलापूर) : गेल्या महिन्याभरापासून कोरोना रोगाची साथ जगात धुमाकूळ घालत असताना तिने आपल्या देशातही प्रवेश केला. नागरिकांना प्रतिबंधक उपाय म्हणून आवश्यक असलेल्या सॅनिटायजरचा मंगळवेढ्यासह बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद
शंभरकर यांनी मंगळवेढा तालुक्यातील दोन साखरकारखान्यांना सॅनिटायजर निर्मिती करण्याचा परवाना दिला आहे.

अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर व नंदुर येथील फॅबटेक शुगर या खाजगी साखर कारखान्याना सॅनिटायजर निर्मिती करण्याचा परवाना दिला. या दोन कारखान्याना उत्पन्नाचा पर्यायी मार्ग निर्माण झाला. अडचणीच्या काळात या कारखान्याचे योगदान जनतेसाठी महत्वाचे ठरणारआहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here