साखरेला उठाव कमी, 11 लाख मेट्रिक टन साखर पडून

665

अहमदनगर :

बाजारातील साखरेची मागणी घटल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, साखरेला उठाव नसल्याने जिल्ह्यातील 28 सहकारी साखर कारखान्यांच्या गोदामात 11 लाख 23 हजार मेट्रिक टन साखर पडून आहे, त्यामुळे जिल्हा बँकेकडून घेतलेली उचल परत करणे कारखान्यांना कठीण झाले आहे.

मागील वर्षीच्या गाळप हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 16 लाख 33 हजार 554 मेट्रिक टन साखर उत्पादन झाले, गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांकडे 4 लाख 30 हजार मेट्रिक टन साखर शिल्लक होती, दोन्ही हंगामाची एकूण 20 लाख 64 हजार मेट्रिक टन साखर कारखान्यांकडे विक्रीसाठी होती,  केंद्र शासनाच्या नियमानुसार साखर कारखान्यांकडून साखर विक्रीसाठी रीतसर निविदा मागविण्यात आल्या, मात्र बाजारात साखरेला मागणी नव्हती, ऑक्टोबर 2018 ते 30 जून 2019, या नऊ महिन्यांत केवळ 9 लाख 40 हजार 787 मेट्रिक टन साखर विकली गेली, उर्वरित 11 लाख 23 हजार 492 मेट्रिक टन साखर गोदांमामध्ये पडून आहे.

साखरेवर प्रति क्विंटल जिल्हा बँकेकडून कारखान्यांना 85 टक्के उचल कर्ज रुपाने मिळते, जिल्ह्यातील कारखान्यांनी जिल्हा बँकेकडून उचल घेतली, मात्र गेल्या नऊ महिन्यांमध्ये साखरेला उठाव नाही, त्यामुळे जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज परत करणे कारखान्यांना शक्य झाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here