उन्हाळ्यासह सणासुदीच्या मागणीमुळे साखरेच्या दरात प्रती क्विंटल १०० रुपयांची वाढ

नवी दिल्ली : देशात अलीकडेच ईद आणि चैत्र नवमी साजरी झाली आहे. या सणासुदीच्या काळातील मागणी आणि उन्हाळा यामुळे देशातील प्रमुख बाजारपेठेत साखरेचे दर वाढले आहेत. देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्या दोन सत्रांमध्ये साखरेच्या दरात प्रती क्विंटल सुमारे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत मध्य उत्तर प्रदेशात (एम-ग्रेड) साखरेचे दर सुमारे ३८९० ते ३९०० रुपये प्रती क्विंटल आहेत तर पश्चिम महाराष्ट्रात (एस-ग्रेड) साखरेचे दर सुमारे ३५०० ते ३५५० रुपये प्रती क्विंटल आहेत.

सरकारने एप्रिल २०२४ मध्ये साखर कारखान्यांना सुमारे २५ लाख टन साखर मासिक विक्री कोटा (साखर मंथली रिलीज कोटा) म्हणून वाटप केला आहे. गेल्यावर्षी, एप्रिल २०२३ मध्ये सरकारने आधी २२ लाख टन साखर कोटा जारी केला होता. नंतर सरकारने उच्च मागणी पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांना २ लाख टन अतिरिक्त साखर कोटा जारी केला होता.

‘चीनीमंडी’ने चालू हंगामातील गाळप कामकाज संपल्यानंतर साखरेच्या किमतीच्या सद्यस्थितीबद्दल वृत्त दिले होते. यामध्ये श्री रेणुका शुगर्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी म्हणाले होते की, उन्हाळ्याच्या जोरदार मागणीमुळे साखरेच्या किमती किंचित वरच्या ट्रेंडसह मर्यादित राहू शकतात. पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भागात एक्स-मिल साखरेच्या किमती १ ते २ रुपये प्रती किलोने वाढण्याची अपेक्षा आहे.

MEIR Commodities चे MD राहिल शेख म्हणाले की, सोलापूर, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकातील जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत साखर कारखाने जादा उत्पन्न मिळवण्यासाठी मंजूर कोट्यापेक्षा जास्त साखर विकत होते, ते गायब झाले आहेत. त्यामुळे आता ऊसाचा गळीत हंगाम संपल्यानंतर महाराष्ट्रात साखरेचे दर किलोमागे दोन रुपयांनी वाढू शकतात. यूपीमध्ये साखरेचे दर ३८०० ते ३९०० रुपये प्रति क्विंटल राहण्याची अपेक्षा राहिल शेख यांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here