नेपाळमध्ये साखरेच्या किंमतीत वाढ

काठमांडू : नेपाळमध्ये सणासुदीचे दिवस जवळ आलेकी साखरेच्या किंमतीत वाढ होते. अलीकडेच रिटेल बाजारात साखरेची किंमत 80-85 रुपये प्रति किलोने वाढून 100 रुपये प्रति किलो झाली आहे. साखरेच्या महागाईसाठी रिटेल विक्रेत्यांनी साखर कारखाना संचालक आणि ठोक विक्रेत्यांना जबाबदार धरले आहे. लाजीपत येथील एक दुकानदार नरेंद्र महारजन यांनी सांगितले की, ठोक विक्रेत्यांकडून उत्पादनाची किंमत वाढल्यानंतर साखरेची किंमत वाढवण्यास त्यांचा नाइलाज झाला होता. सणांमध्ये जवळपास प्रत्येक वर्षी साखरेच्या किंमतीत वाढ होेते.

नेपाळमध्ये साखरेची वार्षिक मागणी 250,000 टन आहे, तर जुलै च्या अखेरपासून सुरु होणार्‍या तीन महिन्यां दरम्यान 35,000 टन साखरेचा अतिरिक्त वापर होतो, जेव्हा अधिकांश सण साजरे केले जातात. गेल्या वर्षी ऑगस्ट च्या मध्या मध्ये, साखर कारखान्यांनी सरकारकडून आयात प्रतिबंध जारी ठेवण्यासाठी सांगितले होते अन्यथा ते किंमती वाढवणार.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here