पाकिस्तानात महागाईने मोडले कंबरडे: साखरेच्या ठोक मूल्यात 90 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ

99

लाहौर : पाकिस्तानी नागरीक साखरेच्या वाढत्या दरामुळे अडचणीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, महागाईने आमची कंबर मोडली आहे. देशातील विविध धान्य बाजारांमध्ये साखरेचे ठोक मूल्य बुधवारी वाढून 90 रुपये प्रति किलो इतके झाले आहे. लाहोरच्या ठोक बाजाराने साखरेची अधिकतम किंमत 90 रुपये प्रति किलो नोंदली आहे, तर फैसलाबाद बाजारातील किंमती 89.4 रुपये ते 90 रुपये प्रति किलो दरम्यान आहेत.

अलीकडेच पाकिस्तान सरकारने 300,000 मेट्रीक टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल पाकिस्तान शुगर मिल्स असोंसिएशनने सरकारला ऑगस्ट ते ऑक्टोबर साठी रणनितिक भंडाराच्या रुपात 300,000 टन साखर आयात करण्याचा प्रस्ताव दिला होता. साखर उद्योगाच्या प्रतिनिधींनी सुचना दिली होती की, बाजारामध्ये साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारला कमीत कमी 300,000 टन साखरेची आयात करणे आवश्यक आहे. ही सूचना उद्योग आणि उत्पादन मंत्री हम्माद अजहर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या साखर सल्लागार बोर्डाच्या बैठकीमध्ये देण्यात आली होती. साखर उद्योगाच्या पक्षाचे प्रतिनिधीत्व असलम फारुक, जका अशरफ, इस्कंदर खान आणि जावेद कयानी यांनी केले होते. बैठकीत सांगण्यात आले होती की, सध्या स्टॉकमध्ये जवळपास 1.6 मिलियन टन साखर आहे, जी जवळपास 3.5 महिन्यांसाठी आवश्यक आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here