इराणमध्ये साखरेचे दर उच्चांकी स्तरावर

366

तेहरान : गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात इराणमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत जवळपास ६० टक्क्यांची दरवाढ झाली आहे. उद्योग, खाण आणि व्यापार मंत्रालयाने जाहीर केलेल्या साप्ताहिक अहवालानुसार ऑक्टोबर २०२०च्या तुलनेत साखरेच्या दरात ७६ टक्के वाढ झाली आहे.
साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण अनुदानित आयात केलेल्या वस्तूंच्या साठ्यात घट दिसून आली आहे. आयातदारांना या मालावर डॉलरमध्ये अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

सध्याच्या इराणी कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत (मार्च २०२१ ते नोव्हेंबर २०२१) या कालावधीत साखरेची आयात १२ टक्के घसरली आहे. इराण व्यापार महामंडळाच्या (जीटीसी) अधिकाऱ्यांनी याची घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here