फिलिपाइन्समध्ये साखरेचा दर उच्चांकी स्तरावर

मनिला : साखर उत्पादक विभागात ओडेट वादळामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीचा हवाला देत साखर नियामक प्रशासकांनी (Sugar Regulatory Administration/SRA) साखरेचा कमी पुरवठा आणि वाढलेले दर कमी करण्यासाठी २,००,००० मेट्रिक टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. वादळाने ऊस पिक, गोदामांतील साखर आणि प्रमुख कारखान्यांच्या जिल्ह्यातील रिफायनरी, कारखान्यांतील उपकरणांची हानी केली आहे. त्यामुळे देशातील ऊस क्षेत्राचे P1.5 billionचे नुकसान झाले आहे. एसआरएन पिक वर्ष २०२१-२२ मध्ये कच्च्या साखरेचे उत्पादन अनुमान २.०९९ मिलियन मेंट्रिक टनापासून घटवून २.०७२ मिलियन मेट्रिक टन केले आहे.

कच्ची साखर आणि रिफाइंड साखरेचे घाऊक आणि किरकोळ दर उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. एसआरएकडील आकडेवारीनुसार २३ जानेवारीपर्यंत मनीलातील कच्च्या साखरेचा घाऊक दर P2,000 प्रती ५० किलो बॅग होता. तर प्रक्रिया केलेली साखर P 2,900 वर विक्री केली जात होती. तर गेल्यावर्षी जानेवारीत साखरेचा दर अनुक्रमे P 1,700 आणि P 2150 होता. दुसरीकडे प्रक्रिया केलेली साखर गेल्यावर्षीच्या P50 च्या तुलनेत P57 प्रती किलो दराने विक्री होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here