पाकिस्तानमध्ये साखरेच्या किंमतीत वाढ

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील विविध शहरांमध्ये साखरेच्या किमती वाढून १०० रुपये प्रती किलो दर झाला आहे. Pakistan Bureau of Statistics (PBS) च्या हवाल्याने ARY News ने याबाबतचे वृत्त दिले आहे. PBS द्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, इस्लामाबादच्या नागरिकांना देशात सर्वाधिक महागड्या दराने साखर खरेदी करावी लागत आहे. येथे साखर १०० रुपये प्रती किलो दराने विक्री केली जाते. कराची, पेशावर, रावळपिंडी आणि देशाच्या इतर भागातही अशीच स्थिती आहे. सद्यस्थितीत लाहोर, बहावलपूर, लरकाना आणि क्वेटामध्ये साखर ९० रुपये प्रती किलो दराने मिळत आहे.

दरम्यान, PBS कडील आकडेवारीनुसार, फैसलाबाद, गुजरावाला आणि हैदराबादमध्ये साखर ८८ रुपये प्रती किलो दराने विक्री केली जात आहे. याशिवाय, सरगोधा, मुल्तान आणि बन्नू येथे साखर ८५ रुपये दराने उपलब्ध आहे. मे महिन्यात पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देशातील कमोडिटींच्या दरात स्थिरता यावी यासाठी साखरेच्या निर्यातीवर पूर्णपणे निर्बंध लागू करण्याचा आदेश दिला होता. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी साखर तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्यात आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here