2020 च्या हंगामात साखरेच्या किंमती 8 टक्क्यांनी वाढू शकतातः क्रिसिल

मुंबई :  हवामानाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागातील ऊस लागवडीत घट झाल्यानंतर साखर हंगाम 2020 मध्ये साखरेचे दर 8 टक्क्यांनी वाढून प्रति किलो 33 ते 34 रुपये होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात हवामानामुळे ऊस लागवडीमध्ये घट झाल्याने साखरेचे उत्पादन 10 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे, असे क्रिसिल यांनी अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, निर्यातीत 20 टक्के वाढ झाल्याने साखरेचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, एकरकमी निर्यातीचे अनुदान जाहीर केल्यामुळे, 2019 मध्ये 3.8 दशलक्ष टन असणार्‍या साखर निर्यातीमध्ये, 2020 मध्ये 4.5 ते 5 दशलक्ष टन इतकी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

इथेनॉल विक्रीची मात्रा आणि साखरेच्या किंमतीत 8 टक्क्यांची वाढ झाल्याने हंगाम 2020 मध्ये कारखान्यांची स्थिती सुधारेल. 2019 च्या हंगामात निर्यात झालेल्या साखर कारखान्यास सरकारने कच्चा माल ऊस प्रति टन 139 रुपये अनुदान मंजूर केले. तसेच निर्यात साखर कारखाने आणि बंदर यामधील अंतरानुसार 1,000 ते 3,000 परिवहन अनुदानही देण्यात आले. यामुळे 2,300 ते 4,300 प्रति टन साखर एकत्रितपणे निर्यात केली. हंगाम 2020 साठी दिले जाणारे अनुदान तब्बल 10,440 प्रति टन आहे.
असे असूनही, 6 दशलक्ष टन साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे अवघड असल्याचे क्रिसिलचे मत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here