पाकिस्तानात साखरेचा दर तब्बल 85 रुपये प्रति किलो

लाहोर :देशभर साखरेचे दर कायम नसल्यामुळे पाकिस्तानात आणखी एक संकट उभे राहिले आहे. लाहोरमध्ये साखरेचा किरकोळ दर प्रति किलो 85 रुपये झाला आहे आणि 50 किलो पोत्याची घाउक किंमत 4,000 रुपये झाली आहे. साखरेचे अधिकृत दर पाळले जात नसल्याने साखर प्रति किलो 70 रुपये वर पोहोचली आहे तरी साखरेची उपलब्धता कमी आहे.

कराची, फैसलाबाद आणि इतर महत्वाच्या शहरांमध्येही साखरेचे दर वाढले आहेत. या दरवाढी विरोधात आंदोलनेही सुरु आहेत. हे दर येणार्‍या सरकारने नियंत्रीत करावेत अशी मागणी नागरीकांनी केली आहे. पाकिस्तानला रोज दीड कोटी किलो साखर रोजच्या वापरासाठी लागते. तर येथील व्यापारी यातून रोज 150 दशलक्ष रुपये फायदा मिळवत आहेत.

तर दुसरीकडे सरकार नफा मिळवणार्‍यांविरोधात काहीच उपाययोजना करत नसल्याची तक्रार सर्वसामान्य नागरीकांनी केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here