पाकिस्तानमध्ये साखरेचे दर लवकरच होणार कमी: मंत्र्यांचे आश्‍वासन

इस्लामाबाद :पाकिस्तान चे उद्योग आणि उत्पादन मंत्री हम्माद अजहर यांनी सांगितले की, देशामध्ये साखर आयात झाल्यावर साखरेचे दर खूपच कमी होतील. ज्यामुळे महागाईमुळे अडचणीत आलेल्या लोकांना दिलासा मिळेल.  सूचना आणि प्रसारण मंत्री शिबली फराज यांच्या बरोबर असताना अजहर म्हणाले, देशामध्ये साखरेच्या आयातीनंतर देशांतर्गत साखर तस्करी करणारेंही खुल्या बजारात आपल्या स्टॉकला बाहेर काढणे सुरु करतील. ज्यामुळे साखरेच्या किंमती आणखी कमी होतील. आयातीच्या बातम्यांनतर साखरेची किंमत यापूर्वीच घटली, असल्याचा दावा त्यांनी केला. मंत्री म्हणाले की, पाकिस्तान -तहरीक- ए -इंसाफ सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी चांगली मेहनत करत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here