अहमदनगर विभागात १०० लाख क्विंटलवर साखर उत्पादन

महाराष्ट्रात या हंगामात गेल्या हंगामाच्या तुलनेत जादा साखर उत्पादन आणि ऊस गाळप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ७८८.५४ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ७९८.७९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.१३ टक्के आहे.

अहमदनगर विभागातील साखर उत्पाजन १०० लाख क्विंटलवर पोहोचले आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अहमदनगर विभागात १०५.९५ लाख टन ऊस गाळप करण्यात आले आहे. येथे १०१.६२ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ९.५९ टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here