मे च्या शेवटपर्यंत साखर उत्पादनात आली 18 टक्के घट, 270 लाख टनाचा अंदाज

ऑक्टोबर 2019 पासून सुरु झालेल्या 2019-20 च्या गाळप हंगामातील पहिले आठ महिने, 31 मे 2020 पर्यंत साखर उत्पादनात 18.11 टक्के घट झाली. दरम्यान एकूण 268.21 लाख टन इतके उत्पादन झाले आहे तर गेल्या गाळप हंगामाच्या समान कालावधीत 327.53 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. चालू गाळप हंगामाच्या शेवटापर्यंत एकूण 270 लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आहे.

इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (इस्मा) अनुसार चालू गाळप हंगामामध्ये 18 साखर कारखान्यामध्ये गाळप अजून सुरु आहे तर गेल्या वर्षी याच काळापर्यंत केवळ 10 कारखान्यात गाळप सुरु होते. इस्माने ऊस गाळप हंगामाच्या आरंभामध्ये 265 लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज लावला होता, पण उत्तर प्रदेशामध्ये लॉक डाउन मुळे गुऱ्हाळ बंद झाल्याने साखर कारखान्यांना जास्त ऊस मिळाला. ज्यामुळे साखरेचे उत्पादन वाढले. चालू गाळप हंगामाच्या शेवटी साखरेचे उत्पादन 270 लाख टन होण्याची शक्यता आहे, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 60 लाख टन कमी राहीले .

इस्मा च्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेशामध्ये चालू गाळप हंगामात मे च्या शेवटी साखर उत्पादन वाढून 125.46 लाख टन झाले आहे, तर गेल्या गाळप हंगामात समान अवधीत राज्यात केवळ 117.81 लाख टन साखर उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेश मध्ये साखरेच्या उत्पादनामध्ये आतापर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत 7.65 लाख टनाची वाढ झाली आहे. राज्यातील 119 कारखान्यांपैकी 105 कारखान्यांमध्ये गाळप बंद झाले आहे तसेच या वेळी 14 कारखान्यात गाळप सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये चालू गाळप हंगामात आतापर्यंत केवळ 60.98 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे जे गेल्या गाळप हंगामाच्या तुलनेमध्ये 46.2 कमी आहे. गेल्या गाळप हंगामात या वेळेपर्यंत 107.20 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. पूर आणि दुष्कााळामुळे महाराष्ट्र मध्ये ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

कर्नाटकात चालू गाळप हंगामात 31 मे पर्यंत साखर उत्पादन कमी होऊन 33.82 लाख टन इतकेच झाले आहे. तर गेल्या हंगामात समान अवधीत राज्यात 43.25 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. कर्नाटमध्ये गाळप 30 एप्रिल 2020 ला बंद झाले होते , पण यावेळी काही कारखान्यात गाळपाचा विशेष हंगाम सुरु होता. तमिळनाडु मध्ये साखर उत्पादन चालू हंगामात 5.78 लाख टन इतके झाले आहे, जे गेल्या वर्षाच्या 7.22 लाख टन पेक्षा कमी आहे.

अन्य राज्यात गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगाना, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ आणि ओडिशा तथा राजस्थान यांना मिळून 31 मे पर्यंत 42.17 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर भारतातील साखर कारखान्यांनी मे मध्ये वाटप करण्यात आलेल्या कोट्यातील साखरेची विक्री केली आहे. पण पश्चिम आणि दक्षिण भारतातील कारखाने लॉकडाउन मुळे कमी साखरेची विक्री करु शकले आहेत, यासाठी केंद्र सरकारने मे च्या कोट्यातील साखर जून मध्ये विक्री करण्याची परवानगी दिली आहे. उद्योगाच्या अनुसार लॉकडाउन खुला झाला आहे, ज्यामुळे मिठाईची दुकाने, हॉटेल्स आदी खुले झाले आहे. त्यामुळे साखरेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे . गाळप हंगाामाच्य शेवटी साखरेचा अतिरिक्त साठा 115 लाख टन वाचण्याचा अंदाज आहे. तर सुरुवातीला 95 ते 100 टन अतिरिक्त साठा उरण्याचा अंदाज होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here