2019-20 हंगामात साखरेचे उत्पादन 28 ते 29 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज

नवी दिल्ली : 2019-20 या हंगामात साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. खाद्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, 2019-20 या हंगामात देशात साखरेच्या उत्पादनात 12.38 टक्के घट होवून ते 28 ते 29 दशलक्ष टन राहील अशी शक्यता आहे. हंगाम 2018-19 च्या दरम्यान देशात साखरेचे उत्पादन 33.1 दशलक्ष टन राहिले होते.  अधिक़ारी म्हणाले, ऊस उत्पादक राज्यांकडून माहिती घेतल्यानंतर साखर उत्पादन 28 ते 29 दशलक्ष टन राहील असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील साखर उत्पादनात मोठी घसरण झाल्याने देशातील साखर उत्पादनात घट झाली आहे. महाराष्ट्रात पूर आणि दुष्काळ यामुळे ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळेे महाराष्ट्रात साखर उत्पादनात कमीत कमी 4 दशलक्ष टनाची घट होईल.  देशात जवळपास 534 साखर कारखाने आहेत. साखर कारखान्यांनी अशत: गाळप सुरु केले आहे, पण 15 नोव्हेंबर पासून गाळप हंगाम जोरात सुरु होईल.  कृषी मंत्रालयानुसार, 2019-20 या हंगामात ऊस उत्पादन 377.77 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, हेच उत्पादन गेल्या हंगामात 400 दशलक्ष टन होते.

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here