महाराष्ट्रात साखर उत्पादन ११२ लाख टनांवर

महाराष्ट्रात साखर उत्पादनाची गती वाढली आहे. आणि राज्यात आतापर्यंत साखर उत्पादन ११० लाख टनांहून अधिक झाले आहे.

महाराष्ट्रातील साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २१ मार्च २०२२ पर्यंत राज्यात १९ साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. सध्या कोल्हापूर विभागात १४ कारखाने बंद झाले आहेत. नागपूर विभागात एक, औरंगाबाद विभागात एक आणि सोलापूर विभागात तीन साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये २१ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १०८४.४२ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ११२३.५६ लाख क्विंटल (११२ लाख टन) साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here