महाराष्ट्रात साखर उत्पादन १५० लाख क्विंटलवर

138

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्रात एकूण १५१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ७४ सहकारी तर ७७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १६९.३५ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १५२.२५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्यात सरासरी साखर उतारा ८.९९ टक्के इतका आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत सोलापूर विभागात ३५ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २४ नोव्हेंबरपर्यंत सोलापूर विभागात ३६.९५ लाख टन उसाचे गाळप करून ३०.५४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. साखर उतारा ८.२७ टक्के आहे.

कोल्हापूर विभागातील साखर उतारा १० टक्क्यांवर आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादही याच विभागात झाले आहे. विभागात आतापर्यंत ४६.८४ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून ४७.५४ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. साखर उतारा १०.१५ टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here