मॉरिशसमध्ये साखर उत्पादन घटण्याचा अंदाज

दिल्ली : चीनी मंडी

देशातील एकूण कृषी उत्पादनांमध्ये ऊस आणि साखरेचा वाटा सर्वाधिक असलेल्या मॉरिशसमध्ये साखर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. हवामानाच्या लहरीपणामुळे सुरुवातीला व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजामध्ये आता घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मॉरिशसच्या चेंबर ऑफ अॅग्रीकल्चरल या विभागानेच ही शक्यता व्यक्त केली आहे.

चेंबर ऑफ अॅग्रीकल्चरल विभागाच्या म्हणण्यानुसार या वर्षी देशात तीन लाख २० हजार टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तीन वेळा हा अंदाज बदलण्यात आला असून, त्यात दर वेळी घटच होत आली आहे. ऊस आणि पर्यायाने साखरेसाठी पोषक हवामान नसल्याने ही घट होणार असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

सुरुवातीला यावर्षी ३ लाख ५० हजार टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ६ नोव्हेंबरला व्यक्त करण्यात आलेल्या दुसऱ्या अंदाजामध्ये साखर उत्पादन ३ लाख २४ हजार होईल, असे सांगण्यात आले. आता तिसऱ्या अंदाजामध्ये यात आणखी घट व्यक्त करण्यात आली आहे. उसापासून तयार केलेल्या साखरेच्या साठ्यापेक्षा उसाच्या वाढीसाठी वातावरण अनुकूल असल्याचे मॉरिशस सरकारचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here