लंडन: यंदाच्या २०२१-२२ या गळीत हंगामात युरोपीयन युनियनमध्ये साखरेचे उत्पादन वाढेल आणि साखरेच्या साठ्यात वाढ होईल असे अनुमान युरोपीयन कमिशनने आपल्या शॉर्टटर्म अहवालातून व्यक्त केले आहे.
यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन वाढून १५.५ मिलिटन टन होईल असा अंदाज युरोपीयन युनियनने व्यक्त केला आहे. याआधीच्या हंगामात १४.५ मिलियन टन साखरेचे उत्पादन झाले होते. बिटचे उत्पादन ७४ टन प्रती हेक्टर होईल असे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. पाच वर्षांच्या सरासरी इतक्या उत्पादनाची शक्यता आहे. सद्यस्थितीत बिटची लागवड एक टक्क्यांनी वाढून १.५ मिलियन हेक्टरपर्यंत वाढली आहे.
अहवालात म्हटले आहे की, लागवडीच्या कालावधीत थंडीच्या माऱ्यामुळे काही रोपे नष्ट झाली. मात्र, बहुसंख्य ठिकाणी त्याची पुर्नलागवड करणे शक्य आहे. थंड हवामानामुळे किडे तसेच रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादन चांगले मिळेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link