अमेरिकेत साखर उत्पादनात सुधारणेची शक्यता

न्यूयॉर्क : अमेरिकेमध्ये ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ या हंगामात, ९.३३ मिलियन शॉर्ट टनहून अधिक साखर उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकन कृषी विभागाने (यूएसडीए) आपल्या मासिक अहवालात वर्तवली आहे.

अमेरिकेत चालू हंगामात बिटचे उच्चांकी उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत यूएसडीएने सांगितले की, बिटपासून उत्पादीत साखरेचे प्रमाण गेल्या हंगामापेक्षा ६.३ टक्क्यांनी वाढून ५.३४ मिलियन टन झाले आहे. उच्चांकी स्थानिक उत्पादन होऊनही अमेरिकेत साखरेचे दर उच्च स्तराच्या आसपास आहेत. कारण २०२१ मधील जागतिक पातळीवर कमी उत्पादनामुळे आंतरराष्ट्रीय दर वधारले आहेत.

यूएसडीएने सांगितले की, किमान एका बड्या अमेरिकन रिफायनरीने ऑक्टोबर महिन्यात २५,००० टन कच्ची साखर खरेदी केली आहे. साखर आयातीवर नेहमी प्रती पाउंड १५ सेंटपेक्षा अधिक शुल्क आकारले जाते. आपल्या मासिक मागणी आणि पुरवठा अहवालात यूएसडीएने ऑक्टोबर महिन्यात २०२१-२२ या पिक अहवालात ३ मिलियनच्या आपल्या साखर आयात अंदाजात ३.०४ मिलियन टन अंशी सुधारणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here