छत्रपती संभाजीनगर विभागात साखर उत्पादन २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : यंदाची छत्रपती संभाजीनगर विभागाची ऊस गाळपाची स्थिती विचार करायला लावणारी निश्चित ठरत आहे. फेब्रुवारी महिन्यातच काही कारखाने आपले गाळप संपवतील, अशी स्थिती आहे. गेल्यावर्षी विभागात एकूण १०९ लाख मे. टन ऊस गाळप झाले. यंदा १२ फेबुवारीपर्यंत ७३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाला आहे. हंगाम अखेरपर्यंत ९० ते ९५ लाख मे. टन ऊस गाळप होईल, म्हणजेच गाळप १५ ते २० टक्के कमी होण्याचा अंदाज आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ सरकारी व ९ खासगी अशा २६ कारखान्यांपैकी यंदा ४ कारखाने कमी झाले आहेत. तरीही गाळप यंदा लवकर संपणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल उत्पादनाबाबतीतील अस्पष्टता, उसाची कमी उपलब्धता, खोडवा उसाचे प्रमाण जास्त असणे ही कारणे गळीत हंगामासमोरील अडथळे बनले आहेत. साखर अभ्यासक कालिदास आपेट यांनी सांगितले की, केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला बंदी घातल्याने कारखान्यांनाची गाळप क्षमता कमी झाली. मजूर शेतकऱ्यांकडून तोडीसाठी २० ते २५ हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे. तर प्रादेशिक साखर संचालक शरद जरे म्हणाले की, साखर गाळप हंगाम क्षमता कमी होणार असल्याची शक्यता आहे. मात्र यंदाचा हंगाम अगदी सुरळीत सुरू आहे, शेतकऱ्यांना कसलीच अडचण नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here