देशात आतापर्यंत झाले 264.65 लाख टन साखर उत्पादन

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) यांच्या अनुसार, देशभरातल्या साखर कारखान्यांनी 1 ऑक्टोबर 2019 पासून 15 मे 2020 दरम्यान 264.65 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. हे गेल्या वर्षाच्या 326.19 लाख टनाच्या तुलनेत जवळपास 61.54 लाख टन कमी आहे. 15 मे 2019 ला 38 साखर कारखान्यांचे गाळप सुरु होते, यावर्षी 15 मे 2020 ला 63 साखर कारखाने गाळप करत आहेत.
यूपी तील साखर कारखान्यांनी 15 मे 2020 पर्यंत 122.28 लाख टन साखर उत्पादन केले होते. जे गेल्या वर्षी या तारखेला उत्पादीत 116.80 लाख टनाच्या उत्पादनापेक्षा 5.48 लाख टन जास्त आहे. हे साखर उत्पादक राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन आहे, जे 2017-18 च्या हंगामामध्ये उत्पादीत 120.45 लाख टनापेक्षा अधिक आहे. यावर्षी 119 कारखान्यांपैकी 73 कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. आणि 46 कारखान्यांनी अजूनही आपले कार्य सुरु ठेवले आहे. गेल्या वर्षी 15 मे 2019 ला केवळ 28 कारखाने सुरु होते.

महाराष्ट्रामध्ये 15 मे 2020 पर्यंत 60.87 लाख टन साखर उत्पादन झाले होते, तर गेल्या वर्षी 2018-19 च्या हंगामामध्ये उत्पादित 107.15 लाख टनाच्या तुलनेत जवळपास 46.3 लाख टन कमी आहे. सध्याच्या 2019-20 च्या हंगामात 145 कारखान्यांनी पूर्वीच राज्यातील गाळप कार्य बंद केले आहे. आणि केवळ 1 साखर कारखाना सुरु आहे. तर गेल्या वर्षी याच तारखेला गाळप हंगाम 30 एप्रिल 2019 मध्ये बंद झाला होता.

कर्नाटकातील सर्व साखर कारखान्यांनी 30 एप्रिल 2020 ला गाळप कार्य बंद केले आहे. आणि त्यांनी जवळपास 33.82 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तामिळनाडू मध्ये 24 कारखान्यांपैकी 9 कारखाने या हंगामात सुरु आहेत. 15 मे 2020 पर्यंत, 5.65 लाख टन साखर उत्पादन झाले आहे, तर गेल्या वर्षी याच तारखेला 7.16 लाख टन उत्पादन झाले होते. गुजरातमधील सर्व कारखान्यांनी चालू हंगामासाठी गाळप बंद केले आहे. आणि 2018-19 या हंगामात उत्पादित 11.21 लाख टन साखरेच्या तुलनेत 9.28 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगाना, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि ओडिसा यांनी सामुहिक पद्धतीने 15 मे 2020 पर्यंत 32.75 लाख टनाचे उत्पादन केले आहे. आतापर्यंत हरियाणा मध्ये 5 कारखाने सुरु आहेत. तर 1 कारखाना उत्तराखंडमध्ये सुरु आहे. जे लवकरच गाळप कार्य बंद करण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here