भारतात साखरेचे उत्पादन घटणार

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर : चीनी मंडी

देशातील काही भागात असलेली दुष्काळी परिस्थिती आणि उसावरील रोगांचा प्रादुर्भाव यांमुळे देशात पुढील हंगामात उसाचे आणि पर्यायाने साखरेचे उत्पादन घटणार आहे. उसाच्या उत्पादनाबरोबरच रिकव्हरी  पण कमी होणार असल्याने साखर उत्पादन ३०० लाख टनाच्या आत येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांतील हे सर्वांत निचांकी उत्पादन असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जगात साखर उत्पादनात भारत ब्राझीलशी बरोबरी करत आहे. गेल्या हंगामात ३२२ तर चालू हंगामात ३१५ लाख टन साखर उत्पादन होत आहे. देशाच्या बाजाराची गरज २६० लाख टन साखरेची आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर आहे. परिणामी सरकारने ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे टार्गेट ठेवले होते. मात्र, यंदा जेमतेम ३० लाख टन साखरच निर्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या हंगामाची सुरुवात १२५ लाख टन शिल्लक साखरेने होईल.

महाराष्ट्र, कर्नाटकमधील दुष्काळी स्थितीमुळे लागवडीचे क्षेत्रच घटले आहे. त्यामुळे ऊस उत्पादन कमी होऊन, साखर उत्पादनावरही त्याचा परिणाम होणार आहे, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here