सीजन २०२१-२२ मध्ये साखर उत्पादन ३१० लाख टन होणार : इस्मा

143

नवी दिल्ली : इथेनॉल निर्मिती करण्यासाठी अधिकाधिक ऊसाच्या रसाचा वापर केला जाणार असल्याने भारतात ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामात साखर उत्पादन ३१० लाख टनावरच कायम राहील असे अनुमान साखर उद्योगाची शिखर संस्था इस्माने व्यक्त केले आहे. साखरेचा गळीत हंगामाचे वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर असे मानले जाते.
भारतीय साखर कारखाना संघाने (इस्मा) आपल्या अहवालात म्हटले आहे की, गळीत हंगाम २०२१-२२ या ऊसाचे एकूण क्षेत्र ५४.४४ लाख हेक्टर होईल अशी शक्यता आहे. चालू वर्षात जवळपास ५२.८८ लाख हेक्टर ऊसाच्या शेतीत जवळपास तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू हंगाात साखरेचे उत्पादन ३०७ लाख टनावर पोहोचले. तामीळनाडू णि कर्नाटकातील विशेष सत्रामध्ये दोन लाख टन अधिक साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२०-२१ या हंगामात एकूण साखर उत्पादन ३०९ लाख टन होईल.

इस्माने सांगितले की वर्ष २०२१-२२ मध्ये साखर उत्पादन जवळपास ३१० लाख टन होईल. चालू वर्षा इतकेच उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र, इस्माने सांगितले की, निविदा आल्यानंतर तसेच साखर कारखान्यांकडून इथेनॉल पुरवठ्याचे करार केल्यानंतर किती ऊसाचे रुपांतर इथेनॉलसाठी होईल हे स्पष्ट होऊ शकेल.

बुधवारी इस्माने आयोजित केलेल्या बैठकीत प्रारंभीक अंदाजाला अंतिम रुप देण्यात आले. यावेळी देशभरातील साखर उत्पादक राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. इथेनॉल बनविल्याशिवाय २०२१-२२ या कालावधीत साखर उत्पादन ३४४ लाख टन होऊ शकते असा इस्माचा अंदाज आहे. चालू हंगामात पाच जुलैपर्यंत एकूण ३३३ कोटी लिटर इथेनॉल करार करण्यत आले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here