साखर विक्री संकटात: देशांतर्गत बाजारपेठेत मागणी पूर्णपणे ठप्प

नवी दिल्ली: कोविड १९ महामारीच्या दुसऱ्या लाटेने पू्र्ण देशाला आणि देशातील प्रत्येक सेक्टरवर परिणाम केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न सुरू असले तरी महामारीचा फैलाव गतीने होत आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. यासाठी विविध राज्यांनी विविध निकष लागू केले आहेत. मात्र, एफअँड बी सेक्टरमध्ये गेल्यावर्षी महामारीमुळे सुरू झालेल्या अनिश्चिततेमध्ये विविध पद्धतीने त्यातून मार्ग काढला. वितरण क्षेत्राने ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन दिले. आणि उत्पादनासाठी पोर्टफोलिओच्या एकत्रिकरणास प्राधान्य दिले. असे अनेक उपाय करूनही बाजारातील प्रमुख उद्योग कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरू शकलेले नाहीत.

साखर उद्योग हा एफएमसीजी सेक्टरमध्ये मुख्य घटक आहे. सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. आणि देशातील इस्लाम धर्मियांचा मुख्य सण रमजानच्या कालावधीत मागणी ठप्प झाल्याने मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स हे घटक बंद असल्याने मिठाई, शितपेये, पदार्थांचा खप शून्यावर आला आहे. यासोबतच विविध समारंभात सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत कपात करण्यात आल्याने परिस्थिती अधिकच बिघडली. देशातील साखरेचे उत्पादन गेल्यावर्षी २७.४ मिलियन टनाच्या तुलनेत सरासरी १०.२ टक्के अधिक आहे. परिणामी देशभरात साखर कारखान्यांतील आर्थिक तणाव वाढला आहे. वाढती उसाची थकबाकी पुढील काही दिवसांत अडचणी वाढविणार आहे.

‘चीनीमंडी न्यूज’शी बोलताना मिठाई, इन्स्टंट मिक्स, पल्प, ज्यूस अशा लोकप्रिय पदार्थांचा ७५ वर्षांचा मान्यताप्राप्त ब्रँड असलेल्या चितळे ग्रुपच्या चौथ्या पिढीतील उद्योजक इंद्रनील चितळे यांनी देश आणि राज्यातील सद्यस्थितीबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, वास्तवात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने मिठाईच्या मागणीत घसरण झाली आहे. दुसऱ्या लाटेने मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसला आहे. याशिवाय, सर्व उद्योजकांना दुकाने उघडण्यासाठी केवळ चार तासांचा कालावधी मिळतो. त्यामुळे वस्तूंच्या विक्रीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत उद्योजक, किराणा दुकानदार यांच्यापासून ब्रँडेड स्टोअर, सुपरमार्केटपर्यंत सर्व विक्रीत मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. कोरोना महमारीमुळे सुरू असलेल्या निर्बंधामुळे विक्रीत सुमारे ४० टक्क्यांची घसरण झाली आहे.

एक प्रमुख एफएमसीजी उत्पादकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जेव्हा या क्षेत्रातील उत्पादक आपल्या गेल्यावर्षीच्या तोट्यातून सावरत असताना यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागणीत घट झाली आहे. मिठाई, केक आणि इतर वस्तूंच्या मागणीत मोठी घसरण झाली आहे.

राजाराम साखर कारखान्याचे मानद सल्लागार पी. जी. मेढे म्हणाले, गेल्या काही आठवड्यापासून साखरेला काहीच मागणी नाही. कारखान्यांच्या गोडावूनमध्ये जादा साखरेचा ढीग लागला आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी उत्तर आणि पूर्व भारतातील आपली पारंपारिक बाजारपेठ पुन्हा मिळविण्यासाठी वाहतूक अनुदानाची मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, यावर निर्णय झालेला नाही. उत्तर पूर्ण भारतातील बाजारपेठेवर सद्यस्थितीत उत्तर प्रदेशातील कारखानदारंचे वर्चस्व आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कारखान्यांना स्थानिक बाजारपेठेत साखर विक्रीस संघर्ष करावा लागला आहे.

याशिवाय शक्ति शुगर्सचे अध्यक्ष एम. णानकिम यांनी सांगितले की, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल बंद असल्याने साखरेची मागणी खालावली आहे. व्यावसायिकांसाठी ही एक अतिशय कठीण आणि आव्हानात्मक परिस्थिती आहे. मात्र, हे वर्ष गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक चांगले असेल अशी अपेक्षा सर्वांना आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने साखरेचा खप कमी झाल्याने बाजारपेठ अडचणीत आली आहे. साखरेच्या मागणीवर दबाव कायम राहील.

साखरेच्या स्थानिक दरांमध्ये देशव्यापी घसरण झाली आहे. १४ मे २०२१ रोजी राज्यातील साखरेचे दर असे आहेत.

महाराष्ट्रात S/३० साखरेचा व्यापार ३११० ते ३१४० रुपये प्रती क्विंटल राहीला आणि M/३० साखरेचा व्यापार ३२१० रुपये प्रती क्विंटल राहीला.
दक्षिण कर्नाटक : S/३० साखरेचा व्यापार ३२०० ते ३२५० आणि M/३० साखरेचा व्यापार ३३०० रुपये राहिला.
उत्तर प्रदेश : M/३० साखरेचा व्यापार ३३३० रुपये राहीला.
गुजरात : न्यू S/३० साखरेचा व्यापार ३१०१ ते ३१११ रुपये आणि M/३० साखरेचा व्यापार ३१६० ते ३१८० रुपये प्रती क्विंटल राहीला.
तामीळनाडू : S/३० साखरेचा व्यापार ३२५० ते ३३२५ रुपये असा राहीला. तर M/३० साखरेचा व्यापार ३३२५ ते३३७५ रुपये राहीला.

(वरील सर्व दर जीएसटी वगळता आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here