पाकिस्तान साखर घोटाळा : या प्रकरणात पंतप्रधान इमरान खान जबाबदार नाहीत: मंत्री असद उमर

इस्लामाबाद: साखर घोटाळा प्रकरणात पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करताना योजना, विकास मंत्री असद उमर यांनी सांगितले की, ते आयोगासमोर चौकशीसाठी येण्यास तयार आहेत.

त्यांनी एका ट्वीट मध्ये चौकशी आयोगाला त्यांना बोलवण्यासाठी विशेष विनंती केली होती. त्यांनी सांगितले की, पीएमएल-एन नेता शाहिद खाकान अब्बासी यांनी चौकशी आयोगाकडे मागणी केली होती की त्यांना आणि पंतप्रधान यांना साखर घोटाळा चौकशीसाठी बोलावले जावे.

मंत्री यांनी स्पष्ट केले की, कॅबिनेट ने आर्थिक समन्वय समितीच्या शिफारशीवर साखर निर्यातीचा निर्णय घेतला होता, यासाठी पंतप्रधान या प्रकारणाला जबाबदार नव्हते. ते म्हणाले, जर चौकशी आयोगाला काही विचारायचे असेल, तर ते मला विचारावे. अब्बासी यांनी सांगितले की, देशामध्ये साखरेच्या किमती वाढवण्याचा निर्णय ईसीसी मध्ये झाला होता

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here