साखर हंगाम २०२१-२२ : जाणून घ्या ISMA कडील लेटेस्ट अपडेट्स

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून (ISMA) जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, देशभरातील साखर कारखान्यांनी १५ एप्रिल २०२२ पर्यंत ३२९.९१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत २९१.८२ लाख टन उत्पादन झाले होते. त्यापेक्षा यंदा ३९.०९ लाख टन जादा उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी १५ एप्रिल २०२१ अखेर गाळप करणाऱ्या १७० कारखान्यांच्या तुलनेत यंदा ३०५ कारखाने ऊस गाळप करीत आहेत.

महाराष्ट्रात २२.५३ लाख टन जादा साखर उत्पादन
महाराष्ट्रात १५ एप्रिल २०२२ अखेर १२६.४८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत १०३.९५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास २२.५३ लाख टनाने हे उत्पादन अधिक आहे. सध्याच्या २०२१-२२ या हंगामात ४५ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. १५३ कारखाने गाळप करीत आहेत. गेल्या हंगामात समान कालावधीत केवळ ५४ कारखाने सुरू होते. त्यांनी २.५५ लाख टन साकर उत्पादन केले होते.

उत्तर प्रदेशात १२० पैकी ५२ कारखान्यांचे गाळप बंद
उत्तर प्रदेशमध्ये १२० कारखाने गाळप हंगामात सहभागी होते. त्यांनी १५ एप्रिल २०२२ पर्यंत ९४.४१ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. १२० कारखान्यांपैकी ५२ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. गेल्या वर्षी राज्यात समान संख्येने कारखाने सुरू होते. १५ एप्रिल २०२१ पर्यंत १००.८६ लाख टन उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी ५४ कारखाने बंद झाले होते.

कर्नाटकमध्ये ७२ कारखान्यांकडून ५९ लाख टन साखर उत्पादन
कर्नाटकमध्ये यंदा १५ एप्रिलअखेर ७२ कारखान्यांनी ५९ लाख टन साखर उत्पादित केली आहे. राज्यात अद्याप ७ कारखाने सुरू आहेत. गेल्या वर्षी समान कालावधीत ६६ कारखान्यांनी मुख्य गळीत हंगामात कामकाज संपुष्टात आणले होते. त्यावेळी ४२.४८ लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी कारखान्यांकडून खास सिझनमध्ये (जून-सप्टेंबर) २.२० लाख टन साखर उत्पादन झाले होते.

तामिळनाडू : २८ कारखान्यांकडून ७.९० लाख टन साखर उत्पादन
तामिळनाडूत यंदाच्या हंगामात २८ कारखान्यांपैकी एक कारखान्याचा गळीत हंगाम आतापर्यंत संपुष्टात आला आहे. उर्वरीत कारखाने हंगामाच्या अखेरपर्यंत गाळप करू शकतात. १५ एप्रिल २०२२ पर्यंत राज्यात साखर उत्पादन ७.९० लाख टन झाले आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत ५.५६ लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २७ पैकी ५ कारखाने बंद झाले होते. २२ कारखाने १५ एप्रिल २०२१ पर्यंत सुरू होते.

गुजरातमध्ये १०.७७ लाख टन उत्पादन, एक कारखाना बंद
गुजरातमध्ये १५ एप्रिलअखेर १४ काखान्यांनी १०.७७ लाख टन साखर उत्पादित केली आहे. तर एक कारखाना बंद झाला आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत ६ कारखान्यांनी ९.५० लाख टन साखर उत्पादन घेतले होते. उर्वरीत राज्यांपैकी आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, ओडिशा आदींनी सामुहिक रुपात १५ एप्रिलअखेर ३१.३५ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. यापैकी बिहार, राजस्थान, ओडिशात आधीच गाळप बंद झाले आहेत. उर्वरीत राज्यांपैकी पंजाबमध्ये १३, मध्य प्रदेशात १२, हरियाणात १, उत्तराखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी २, तेलंगणात ६ कारखाने बंद झाले आहेत.

आतापर्यंत जवळपास ८० लाख टन साखर निर्यातीचे करार
बाजारातील रिपोर्ट आणि बंदरातील स्थितीनुसार, आतापर्यंत ८० लाख टन साखर निर्यातीचे करार करण्यात आले आहेत. आतापर्यंत ५७.१७ लाख टन साखर ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत निर्यात करण्यात आली आहे. गेल्या हंगामात या कालावधीत ३१.८५ लाख टनाची निर्यात झाली होती. एप्रिल २०२२ मध्ये साधारणतः ७-८ लाख टन साखर निर्यातीच्या प्रक्रियेत आहे. चालू वर्षी इंडोनेशिया, बांगलादेश या देशांना एकूण निर्यातीच्या ४४ टक्के वाटा आहे. तर गेल्या वर्षी इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के निर्यात झाली होती.

हंगामाच्या अखेरपर्यंत ६८ लाख टन साखर साठा शक्य
ISMA ने यापूर्वी समितीच्या बैठकीत आपले उत्पादन अनुमान सुधारून ३५० लाख टन केले आहे. महाराष्ट्रात १३४ लाख टन तर कर्नाटकमध्ये ६२ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. ISMAने हंगामाच्या निर्यातीचे अनुमान सुधारणा करत ९० लाख टनाहून अधिक केले आहे. २७२ लाख टनाचा देशांतर्गत खप लक्षात घेता ३० सप्टेंबर २०२२ रोजी, हंगामाच्या अखेरीस ६८ लाख टनाचा स्टॉक शिल्लक राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here