पंजाबमधील साखर हंगाम १५ नोव्हेंबरपासून : मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी

चंदीगड : माझा आणि दोआबा परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी २०२१-२२ या गळीत हंगामात खासगी साखर कारखान्यांसह सहकारी साखर कारखान्यांचे गाळपही १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत शेतकऱ्यांना आश्वासन दिले.

तत्पूर्वी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्याकडे ऊस क्षेत्राबाबत आणि सध्या भेडसावत असलेल्या समस्या मांडल्या होत्या. आपल्या विभागात ऊस हेच मुख्य पिक आहे. त्यावरच शेतकऱ्यांचा, विभागाचा आर्थिक विकास अवलंबून आहे. असे असताना यावेळी राज्यातील खासगी साखर कारखान्यांनी गळीत हंगामाच्या वेळापत्रकाचे पालन केलेले नाही. कारखाने कधीपासून गाळप सुरू करतील याबाबत कोणतीच स्पष्टता आलेली नाही, असे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू होत असल्याचे सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here