दक्षिण आफ्रिकेसमोर साखर तुटवड्यामुळे मोठे संकट

केपटाउन : दक्षिण आफ्रिका साखरेच्या तुटवड्याच्या गंभीर संकटाचा सामना करीत आहे. आणि स्थानिक कारखाने देशांतर्गत मागणीचा पुरवठा करण्यास असमर्थ आहेत असे असोसिएशन ऑफ सदर्न आफ्रिका शुगर इंपोर्टर्सचे (Asasi) अध्यक्ष क्रिस एंगेलब्रेक्ट यांनी म्हटले आहे. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीचा सामना करीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी साखरेचा तुटवडा हा आणखी एक झटका आहे. युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हे संकट वाढले आहे. एंगेलब्रेक्टर म्हणाले की, आता साखर म्हणजे पांढऱ्या सोन्यासारखी झाली आहे. सफेद साखर आता R16 500 प्रती टन (व्हॅट वगळता) दराने मिळत आहे. याची सामान्य किंमत R11 500 प्रती टन (व्हॅट वगळता) अशी आहे.

एंगेलब्रेक्ट म्हणाले की, आम्ही आगामी काळात स्थानिक बाजारपेठेत साखरेची टंचाई निर्माण होऊ शकते याबाबत गेल्या १० महिन्यांत तीन वेळा मंत्री कार्यालयाला कळवले होते. सर्वात आधी जुलै २०२१ मध्ये जेव्हा निदर्शने, आंदोलनांमध्ये ३,००,००० टन ऊस जाळण्यात आला, तेव्हा ही माहिती दिली होती. दुसऱ्यांदा, डिसेंबर २०२१ मध्ये जेव्हा या हंगामात १० लाख हेक्टरवर उसाचे गाळप होणार नाही याचे वृत्त आले, तेव्हाही आम्ही याबाबत सूचना केली. आणि तिसऱ्यांदा, एप्रिल २०२२ मध्ये जेव्हा खरोखर साखर उपलब्ध नव्हती, तेव्हाही कळविण्यात आले आहे. ते म्हणाले की, सध्याच्या दरवाढीचा नव्या पिकावर काय परिणाम होईल याची माहिती सध्या उपलब्ध नाही. मात्र, तरीही स्थानिक कारखाने या मागणीचा पुरवठा करू शकणार नाहीत. ते म्हणाले की, स्थानिक उद्योगांना पाठबळ देण्यासाठी आयात बंद करण्यात आली आणि आता साखर उपलब्ध नाही. South African Farmers Development Association (Safda)चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. सियाबोंगा मदलाला यांनीही स्थानिक बाजारपेठेत साखरेचा तुटवडा असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here