फिलीपाईन्समध्ये कमी उत्पादन, आयातीस उशीरामुळे साखरेचा तुटवडा

मनिला : गेल्या तीन वर्षांमध्ये २.०३ मिलियन टन सरासरी वार्षिक मागणीच्या तुलनेत फिलिपाईन्समध्ये २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन १.८ मिलियन टन होण्याची शक्यता असल्याचे Sugar Regulatory Administration (SRA) ने बुधवार सांगितले. साखर उत्पादनाच्या आधीच्या १.९८ मिलियन टनाच्या पुर्वानुमानापेक्षा हे उत्पादन कमी असेल. यासोबतच रिफाइंड स्वीटनरच्या २,००,००० टनापर्यंतच्या नियोजित आयातीस उशीर होत असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. SRA ने साखर उत्पादनातील घसरणीसाठी डिसेंबरमध्ये झालेल्या शक्तीशाली वादळ आणि प्रतिकूल हवामानाला जबाबदार धरले आहे.

मात्र, आतापर्यंत स्थानिक बाजारपेठेत साठेबाजी अथवा खरेदी-विक्रीतील गडबडीचे कोणतेही संकेत नाहीत. साखरेचा तुटवडा आणि वाढत्या किमती या बाबी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फर्डिनेंड मार्कोस ज्युनिअर यांच्यासमोर प्रमुख आव्हान असेल, जे ३० जून रोजी कृषी विभाग सांभाळणार आहेत. साखरेचा तुटवडा कमी करण्यासाठी SRA ने फेब्रुवारी महिन्यात २,००,००० टन रिफाईंड साखर आयात करण्यास मंजुरी दिली होती. मात्र, स्थानिक उत्पादकांच्या समुहाने न्यायालयाकडून निर्बंध लागू करण्याच्या आदेशाची मागणी केल्याने योजनेस उशीर झाला. फिलिपाईन्स साखरेचा नियमित आयातदार नाही. मात्र, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा थायलंडकडून साखरेची खरेदी केली जाते. थायलंड हा ब्राझील नंतर जगातिक द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here