तुर्कस्तानमध्ये पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे साखरेचा तुटवडा

अंकारा : तुर्कस्तानमध्ये पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे साखर, तेल टंचाईचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे देशातील अनेक सुपरमार्केट्समध्ये तेल आणि इतर महत्वाच्या खाद्य पदार्थांच्या खरेदी मर्यादीत करण्यात आली आहे. रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गैलीप आयकाक यांनी सांगितले की, पुरवठ्याती अडचणींमुळे ग्राहकांना अन्न शिजविण्यासाठीच्या तेलाची विक्री मर्यादीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात सुपर मार्केटमध्ये विक्रीसाठी साखर उपलब्ध होण्यात अपयश आले होते. दुसरीकडे देशातील नागरिकांनी आटा, साखर, तेलासह जीवनवश्यक वस्तूंचा साठा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तुर्की शुगर रिफायनरीज कॉर्पोरेशनला (तुर्कसेकर) राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांनी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार १२ नोव्हेंबरला कृषी मंत्रालयाशी संलग्न करण्यात आले. महामंडळाने आपले दर कायम ठेवले. मात्र खासगी कंपन्यांनी आपल्या किमतीत ४० टक्क्यांची वाढ केली. तुर्कसेकरने आता आपल्या किमतीत २५ टक्क्यांची वाढ केली आहे. मात्र, अद्याप पुरवठा मागणीनुसार होत नसल्याची स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here