कुलूप तोडून साखरेची चोरी

अंबिकापूर : छत्तीसगड येथील अंबिकापूरमध्ये शासकीय उचित मूल्य दुकानाचे कुलूप तोडून इतर राशन सामग्रीबरोबरच साखरेचीही चोरी झाली. या चोरीची नोंद ओडगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मध्यान्ह भोजन कार्यक्रमासाठी गेल्या 21 जुलै ला प्राथमिक लाभधारक, अंत्योदय, निराश्रित यांच्या वाटपासाठी ही सामग्री मिळाली होती. या सामग्रीमध्ये 7.21 क्विंटल साखर होती, यामधून 41 किलोचे वाटप झाले होते. दि. 13 ऑगस्ट रोजी झालेल्या साखर वाटपानंतर दुकानाला कुलूप लावण्यात आले होते. दुसर्‍या दिवशीच हा प्रकार घडला. या घटनेनंतर चोरीची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी पुढीच तपास सुरु केला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here