इजिप्तसमोर अपुऱ्या साखर पुरवठ्याचे संकट

कैरो : इजिप्तच्या देशांतर्गत बाजारपेठेत सफेद साखरेच्या किमतीने अभुतपूर्व उसळी घेतली आहे. गेल्या काही दिवसांत १ टन सफेद साखरेची किंमत १६,७५० इजिप्त पाऊंड (६८२ अमेरिकन डॉलर) पर्यंत पोहोचली आहे. किरकोळ दुकानांमध्ये लोकप्रिय अल-डोहा साखरेच्या एका पॅक (१.१-१.६ पाउंड) ची किंमत वाढून २३ इजिप्त पाऊड (($ ०.९४) झाली आहे. तर कमी गुणवत्तेच्या ब्रँडच्या किमती १८ पाऊंड आणि २१ पाऊंड झाल्या आहेत. इजिप्तमध्ये नहर शुगर कंपनीच्या बीटचे गाळप सुरू आहे. आणि हा कारखाना ९,००,००० टनाहून अधिक साखरेचे वार्षिक उत्पादन करणारा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. तरीही देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा तुटवडा आहे. इजिप्तच्या बाजारपेठेत उत्पादन आणि खप यांमध्ये साधारणतः ६,००,००० टन साखरेची तुट आहे. कारण इजिप्तमध्ये सफेद साखरेचे उत्पादन २.६ मिलियन टन होते. तर वार्षिक खप ३.२ मिलियन टन आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इजिप्तच्या बाजारातील अपुरा पुरवठा आणि अमेरिकन डॉलरचा तुटवडा या कारणांमुळे साखर तुटवड्याचे संकट आले आहे. या दोन्ही कारणांमुळे बंदरांमधून कच्चा साखरेचे शिपमेंट पोहोचलेले नाही. यासोबतच युक्रेनमधील कोरोना व्हायरसचा प्रकोप आणि रशियासोबतच्या युद्धामुळे शिपिंग तसेच आयातीची जागतिक समस्या आणखी वाढली आहे. इजिप्तच्या चेंबर ऑफ फूड इंडस्ट्रिजमधील शुगर डिव्हिजनचे प्रमुख हसन अल-फंडी यांनी सांगितले की, साखरेच्या किमती पुरवठ्यातील तुटवड्यामुळे वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here