आंबा घाट बंद असल्याने साखर वाहतूकदार हवालदिल

कोल्हापूर : मान्सूनच्या काळात भूस्खलन झाल्याने रस्ता कमकुवत झाल्याने आता आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या घाट परिसरात हंगामात जोरदार पाऊस झाला होता.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, घाटाच्या दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अवजड वाहनांना पर्यायी रस्ता लांब असल्याने आर्थिक फटका बसत आहे. सुमारे ६०-७० किलोमीटर अंतर वाढले आहे. रत्नागिरीतील जयगड बंदराचा वापर साखर वाहतुकीसाठी केला जातो. यावर्षी बंदरातून जवळपास ५ लाख टन साखर निर्यात केली जाते. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील साखर या बंदरात दररोज येते. जयगड बंदर पोहोचण्यासाठी सध्या वाहनांना लांबचा रस्ता वापरावा लागत आहे. त्यास अधिक वेळ आणि पैसे लागतात. त्यामुळे जयगड बंदरापर्यंत जाण्यासाठी वाहनमालक तयार होत नाहीत. त्यामुळे कारखाने वेळेवर साखर पाठवू शकत नाहीत. त्यामुळे कारखानदार, व्यापारी आणि वाहतूकदारांचे नुकसान होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here