साखरेचा ट्रक घाटातून थेट दहा फुट खोल खड्ड्यात पलटी, चालकाचा मृत्यू

130

बीड: जिल्ह्यातील खूप खोल असणाऱ्या सौताडा घाटातून जाताना साखरेची पोती असलेला ट्रक दहा फूट खोल खड्ड्यात पडला. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात ट्रक चालक लायक शब्बीर पठाण यांचा जागीच मृत्यू झाला.

साखरेची पोती घेऊन हा ट्रक रेनापूर शुगर कारखाना अंबाजोगाई येथून पनवेलकडे जात होता. हा ट्रक पाटोदा तालुक्यातील सौताडा घाटामध्ये आल्यानंतर ट्रक चालकाला रस्त्याचा नीटसा अंदाज न आल्याने ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक घाटातून थेट दहा फुट खोल खड्ड्यात पलटी झाला. यावेळी गाडीचा क्लिनर आधीच खाली पडल्यामुळे वाचला. पण ट्रक चालक लायक पठाण स्टेअरिंगमध्ये अडकला. त्याला बाहेर पडणे शक्यच नव्हते. त्याच झटापटीत त्याचा जागीच मृत्यू झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here