बरेली : थकीत ऊस बिले व्याजासह मिळावीत यांसह विविध मागण्यांसाठी साखर कारखान्यात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. शेतकऱ्यांनी साखर घेऊन जाणारी वाहने रोखून धरली. त्यानंतर रात्री उशीरा उप जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत प्रवेशद्वार उघडले. दरम्यान, आंदोलनस्थळी जिल्हा ऊस अधिकारी न फिरकल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. थकीत व्याजाची माहिती न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकरी सहा जुलैपासून कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करीत आहेत. किसान मजदूर मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व्ही. एम. सिंह यांनी आंदोलनस्थळी येऊन मार्गदर्शन केले होते. शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिले आणि त्यावरील व्याजाची माहिती मागवली होती. मात्र ही माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रदेशद्वाराला कुलूप ठोकले. साखर घेऊन जाणारे ट्रकही अडविण्यात आले. उप जिल्हाधिकारी राजेंद्र प्रसाद यांनी घटनास्थळी येऊन चर्चा केली. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी प्रवेशद्वार उघडले. शेतकरी मंजित सिंह यांनी सांगितले की, अपुरी माहिती देण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी चर्चेस यावे अशी मागणी करण्यात आली आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link