‘न्यूट्रियंट्स’च्या साखरेचा 15 जुलैला जाहीर लिलाव

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर: ‘न्यूट्रियंट्स’ची 43 हजार 922 क्विंटल तारण साखरेची विक्री करून शेतकर्‍यांची थकीत एफआरपी भागवण्याचा निर्णय जिल्हा बँक व अथर्व कंपनीने घेतला आहे. या साखरेचा जाहीर लिलाव 15 जुलैला जिल्हा बँकेच्या मुख्यालयातच दुपारी एक वाजता होणार आहे.

जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना न्यूट्रियंट्स कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. कंपनीने 2016-17 या गळीत हंगामात 1 लाख 40 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. ही तयार झालेली साखर जिल्हा बँकेकडे तारण ठेवून कंपनीने कर्ज उचलले होते. या कर्जातूनच शेतकर्‍यांची एफआरपी भागविण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, पुढील एफआरपी भागविण्यास कंपनीने असमर्थता दर्शवल्याने न्यूट्रियंट्सचा जिल्हा बँकेसोबतचा भाडेकरार संपुष्टात आला होता.

यानंतर नव्याने भाडेतत्त्वाची निविदा प्रक्रिया राबवून अथर्व इंटरट्रेड कंपनीला हा कारखाना चालविण्यास देण्यात आला. यावेळी बँक आणि कंपनीने एकत्रितपणे ही ‘एफआरपी’ची रक्कम अदा करावी, असे ठरले होते. त्यानुसार कंपनी व बँक यांनी संयुक्तपणे प्रादेशिक साखर सहसंचालक, चंदगड तहसीलदार आणि शेवटी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकर्‍यांची यादी मागणी केली होती. तथापि आजअखेर ही यादी मिळालेली नाही; पण शेतकर्‍यांची होणारी आर्थिक अडचण ओळखून बँकेने कर्जापोटी तारण असलेली साखर विक्री करून एफआरपी भागविण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here