35 ते 36 रुपये प्रति किलो मिळणार साखर: जिल्हाधिकारी आंजनेय कुमार सिंह

116

रामपूर(उत्तरप्रदेश): लॉकडाउन दरम्यान नागरीकांना दिलासा देण्यासाठी रामपूरचे जिल्हाधिकार्‍यांनी साखरेचे दर निश्‍चित केले आहेत. आता ग्राहकांना 35 ते 36 रुपये प्रति किलो दराने साखर मिळू शकेल. यापूर्वी 40 ते 42 रुपये प्रति किलो पर्यंत साखर मिळत होती. डीएम यांच्या या निर्णयामुळे आता ग्राहकांना फायदा होईल.

अमर उजला मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यानुसार, प्रशासनाकडून लॉकडाउनमध्ये आवश्यक खाद्य पदार्थांचे दरही निश्‍चित करण्यात आले आहेत. यासाठी पहिल्यांदा डीएम यांनी पिठाचे दर निश्‍चित केले, यामध्ये सोमवारी पुन्हा कपात करण्यात आली होती. पण लोकांना साखर खूप महाग मिळत होती. काही दुकानदारांनी तर लॉकडाउनचा फायदा उठवत साखर अधिक महाग विकली. यामुळे जिल्हाधिकार्‍यांकडे खूप तक्रारी येत होत्या. अशामध्ये आता जिल्हाधिकारी आंजनेय कुमार सिंह यांनी साखरेचे दर निश्‍चित केले. त्यांनी सांगितले की, रिटेल बाजारात साखर 35 ते 36 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळेल. जर बाजारात 35 ते 36 रुपये प्रति किलोपेक्षा अधिक साखरेची विक्री झाली तर दुकानदारांविरोधात कारवाई केली जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here